Scholarships
शैक्षणिक सवलती
Scholarships & Concessions
EBC फी सवलत
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न ८,००,०००/- रुपये पेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यास महाराष्ट्र सरकार तर्फे EBC ची सवलत मिळते. EBC ऑनलाईन फॉर्म, गुणपत्रकाची सत्यप्रत, तहसिलदाराचे उत्पनाचे प्रमाणपत्र, कुटूंबमर्यादा प्रमाणपत्र इत्यादीची पूर्तता करून हार्ड कॉपी महाविद्यालयात जमा करावी.
भारत सरकार शिष्यवृत्ती
अनुसुचित जाती, अ.जमाती, विमुक्त व भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २,५०,०००/- रुपये पेक्षा कमी असल्यास भारत सरकार शिष्यवृत्ती मंजूर होते. ऑनलाईन फॉर्म भरून हार्डकॉपी महाविद्यालयात सादर करावी. शिष्यवृत्ती फॉर्म न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्यूशन फीस स्वतः भरावी लागेल.
राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
विद्यार्थ्यांच्या अंगी सामाजिक मूल्य रूजवून व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने विद्यापीठाच्या परवानगीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग महाविद्यालयात चालू आहे. विभागामार्फत समाजासंबंधी ज्वलंत समस्यांवर जनजागृती केली जाते.